जळगाव : अल्पवयीन मुलीची हत्या उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकरी देखील गजाआड केला आहे. सुरुवातीला या घटने प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर तपासाअंती स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील असे भडगाव येथील अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचे आढळून आल्यानंतर सुरुवातीला 30 जुलै रोजी भडगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने मुलीचा शोध घेतला असता तिची चप्पल भडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका खळ्यात आढळून आली. त्या चपलेजवळच असलेला कुट्टीचा ढिगारा उपसला असता त्यात मुलीचा मृतदेह आढळून आला.
खळ्याचा मालक व परिवाराची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल चौकशी केली. या चौकशीअंती खळ्याच्या मालकाचा मुलगा स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील याचे वर्तन संशयास्पद आढळून आले. सखोल चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. अधिक तपासकामी त्याला भडगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.पो.नि. निलेश राजपूत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरिष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे आदींनी या गुन्ह्याचा उलगडा केला.