कंत्राटदार कासट यांच्या कार्यालयातून अडीच लाखांची चोरी

On: August 7, 2023 7:10 AM

जळगाव : पाळधी येथील कासट गृप कार्यालयातून रोख रकमेची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दैनिक दिव्यमराठी प्रेसच्या मागील बाजूस सरकारी कंत्राटदार तथा विट भट्टी मालक अनिल अशोक कासट यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय बंद असतांना हा चोरीचा प्रकार घडला आहे.

5 ऑगस्ट रोजी सायंकाळी कासट यांचे कार्यालय बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला व दुस-या दिवशी उघडकीस आला. या घटनेत अज्ञात आरोपीने कार्यालयाच्या खिडकीची ग्रिल कशाने तरी उचकटून ड्रावर मधील रोख 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड चोरी केली आहे. कार्यालयाच्या दरवाजाचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. उमेश भालेराव पुढील तपास करत आहेत.      

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment