कपड्यांचे माप घेण्यासाठी बोलावून विद्यार्थिनीचा विनयभंग

On: August 8, 2023 10:54 AM

जळगाव : टेलरप्रमाणे कपड्यांचे (नकाब) माप घेण्याचा बहाणा करुन कार्यालयात बोलावलेल्या विद्यार्थीनीचा अतिशय घृणास्पद पद्धतीने विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यामुळे शैक्षणीक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला धमकी दिल्याचा आरोप आहे.

सावदा येथील गौसिया नगर येथील अ‍ॅंग्लो उर्दू हायस्कुल मधे एक अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. त्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिला संस्थेच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तुला नविन नकाब देतो. त्यासाठी टेलर प्रमाणे माप द्यावे लागेल असे आमिष दाखवून विद्यार्थिनीला बोलावण्यात आले. विद्यार्थिनी कार्यालयात येताच दरवाजा आतून बंद करण्यात आला. कार्यालयाचे दिवे बंद करुन कपड्याचे माप घेण्याचा बहाणा करुन तिच्या नाजुक गुप्त अवयवांना स्पर्श करुन तिचा घृणास्पद पद्धतीने विनयभंग करण्यात आल्याची विद्यार्थिनीची तक्रार आहे.

घडलेला प्रकार विद्यार्थिनीने मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान यांना सांगितला. मात्र मुख्याध्यापकाने हा प्रकार कुणाला सांगू नको, नाहीतर तुला शाळेतून काढून टाकेन अशी धमकी दिल्याची विद्यार्थिनीची तक्रार आहे. याप्रकरणी अक्रमखान अमानुल्ला खान, इरफान खान जमशेर खान, फिरोज खान सुपडू आणि शेख अशरद शेख सईद अशा चौघांविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी 7 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले करत आहेत.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment