बेसावध पत्नीवर पतीचा जीवघेणा हल्ला

On: August 10, 2023 7:52 AM

जळगाव : झोपेत बेसावध असलेल्या पत्नीवर पतीने मोटार सायकलच्या स्टील शॉकअपच्या दांड्याने हल्ला करुन तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपट शांताराम सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्या विसापूर तांडा चाळीसगाव येथील हल्लेखोर पतीचे नाव आहे.

चारित्र्याच्या संशयातून पोपट सोनवणे याने त्याच्या पत्नीच्या डोक्यावर शॉकअपच्या रॉडने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment