नवी दिल्ली : कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध होणार नाही असे स्पष्टीकरणा आता सिरमने दिले आहे. ही लस ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनिसा संयुक्तपणे विकसित करत आहे. सर्वत्र बातम्या प्रसारीत झाल्यानंतर आता मात्र सिरमने मोफत लस देण्याचा इन्कार केला आहे. आम्ही केवळ लसीचे उत्पादन व साठा करणार असल्याचे सिरमने म्हटले आहे.
कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा प्रगतीपथावर आहे व तो यशस्वी झाल्यास तसे कळवले जाईल असे सिरमने म्हटले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लगेचच उत्पादनाला सुरुवात केली जाणार आहे.