प्रेयसीचे ठरले दुसरीकडे लग्न – विनयभंगासह शिवीगाळ आणि मारहाण

जळगाव : प्रेमसंबंध तोडून प्रेयसीचे दुस-यासोबत लग्न ठरल्याचे समजल्याने चिडलेल्या प्रियकराने तिचा विनयभंग करुन तिला ब्लॅकमेल, शिवीगाळ आणि इतरांनी मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश मुलचंद पवार, रत्नाबाई मुलचंद पवार, मुकेश चव्हाण, प्रविण राठोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चाळीसगाव येथील संशयीत आरोपींची नावे आहेत.

आकाश मुलचंद पवार याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणास्तव दोघांमधे बेबनाव झाला. त्यामुळे तिने आकाश सोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले. दरम्यान तरुणीचे दुसरीकडे लग्न ठरल्याचे आकाश यास समजले. मी तुझे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही, तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल नाहीतर मी आपल्या दोघांचे फोटो तुझ्या सासरी पाठवेन अशी त्याने तरुणीला धमकी दिली.

स्त्रीमनास लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीने पाठलाग करुन आकाशने तिला वारंवार त्रास दिल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. याशिवाय त्याच्या इतर नातेवाईकांनी तरुणीला सार्वजनिक जागी अश्लिल शिवीगाळ करत दगड विटांनी मारहाण केल्याने ती जखमी झाली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. सागर ढिकले करत आहेत.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here