मुंबई : दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र या वर्षी कोरोनाचे सावट पसरले असल्यामुळे तसेच अटी व नियमांमुळे भाविकांचा गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे. गर्दी टाळण्यासाठी आता केवळ विभागातील रहिवासी भाविकांनाच दर्शन मिळणार आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासह विभागातील भाविकांचे तपमान तपासण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. लालबागच्या राजाचे हे ९३वे वर्ष आहे. यावर्षी अतिशय साधेपणाने गणरायाची स्थापना व उत्सव साजरा केला जात आहे. लोकमान्य टिळकांची या वर्षी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यांना आदरांजली वाहण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. तशी आरास करण्यात आली आहे.