रागाच्या भरात आणि प्रेम प्रकरणामुळे घरातून निघून जाणा-यांचे वाढले प्रमाण

जळगाव : घरगुती त्रासाला आणि कटकटीला वैतागून कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून जाणा-या स्त्री पुरुषांचे प्रमाण सध्या वाढत आहे. याशिवाय प्रेम प्रकरणातून तरुण तरुणींचे देखील निघून अथवा पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रकार निश्चितच चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात एकाच दिवशी एकुण सात मिसींग दाखल झाल्या आहेत. अशा मिसींग देशभरात दररोज दाखल होत असतात. शनीपेठ पोलिस स्टेशनला दाखल एका मिसींग मधे एक लेडीज टेलर तरुणी कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे. जामनेर येथील दोन घटनेत दोन पुरुष कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले आहेत. याप्रकरणी एकाच्या पत्नीने तर दुस-याच्या मुलाने मिसींग दाखल केली आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल एका घटनेत सत्तर वर्ष वयाची महिला घरातून निघून गेली आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल एका मिसींगनुसार एक 45 वर्ष वयाचा इसम घरातून निघून गेला आहे. त्याच्या पत्नीने मिसींग दाखल केली आहे. यावल आणि निंभोरा येथील एक स्त्री आणि एक पुरुष देखील कुणाला न सांगता निघून गेले आहेत. काही महिन्यापुर्वी सासू आणि पत्नीच्या त्रासाला वैतागून एक तरुण घरातून निघून गेला होता. घरगुती कलह आणि प्रेम प्रकरण या घटनेमागचे वास्तव असल्याचे म्हटले जात आहे. राग शांत झाल्यानंतर आणि प्रेमात धोका मिळाल्यानंतर संबंधीत आपापल्या घरी परत येत असतात. मात्र त्यात घरातील सदस्यांची मानसिकता खराब झालेली असते. सुबह का भुला शामको घर लौट आता है तो उसे भुला नही कहते असे म्हटले जाते. अशा घटना टाळण्यासाठी घरातील वातावरण पोषक असणे देखील गरजेचे असल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here