जळगाव : पाच लाख रुपये लाचेच्या स्वरुपात स्वीकारणारा सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. सखाराम कडू ठाकरे असे लाचेच्या सापल्यात अडकलेल्या विशेख लेखा परीक्षकाचे नाव आहे. सखाराम ठाकरे याच्याकडे विशेष लेखा परीक्षक म्हणून सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव संस्था जळगाव तथा अवसायक श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमितेस यावळ जिल्हा जळगाव येथील अतिरिक्त कार्यभार देखील आहे. सखाराम ठाकरे हा सध्या पाचोरा येथे राहण्यास आहे.
नगर परिषद सावदा जि. जळगाव येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावे वर्ग करून देण्यासाठी लाचखोर सखाराम ठाकरे याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष पाच लाख रुपयांची मागणी केली. 16 ऑगस्ट रोजी मागणी केल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी ही लाचेची रक्कम स्विकारण्यात आली. धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी अभिषेक पाटील यांच्या अधिपत्याखाली हा सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. धुळे शहर पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि हेमंत बेंडाळे, पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.