जळगाव दि.22 प्रतिनिधी – अनुभूती चंद्रयान महोत्सवासारखे उपक्रम राबवून भविष्यात या शाळेतून अवकाश घडतील असे प्रतिपादन खगोल अभ्यासक अमळनेर येथील विजयसिंग पवार यांनी केले. ती चांद्रयान महोत्सवात आयोजित “अवकाशावर बोलू काही” या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विज्ञान लेखक नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना विजयसिंग पवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना अवकाशाशी संबंधित चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.ते पुढे म्हणाले की, अवकाश क्षेत्रात भविष्यात अफाट संधी आहेत. तंत्रज्ञानाची कास धरणारी नवीन पिढी निर्माण करणे समाजाची जबाबदारी आहे .चंद्रयान, मिशन आदित्य, गगनयान यासारख्या मोहिमातून भारताने अवकाश क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भविष्यात भारत अवकाश तंत्रज्ञानाचे नेतृत्व करणार आहे.या नेतृत्वासाठी सक्षम पिढ्या घडविले. आपली जबाबदारी आहे हे काम अनुभूती विद्यालय सक्षमपणे करते आहे. याची आज जाणीव झाली. स्वर्गीय भवरलालजी भाऊ यांच्या दातृत्वातून अनेक घरांमध्ये कीर्ती आणि यशाचा दिवा पेटतो आहे. अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल चे काम पाहून मी आज थक्क झालो. असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बागरेचा, वंदना मारकड यांनी केले. रिटा महाजन यांनी आभार मानले.