चोरांच्या मारहाणीत जखमी वाचमनचा मृत्यू

On: August 24, 2023 10:30 AM

जळगाव : रात्रीच्या वेळी आलेल्या चोरांनी केलेल्या मारहाणीत दुकानाची रखवाली करणा-या वाचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अरुण आत्माराम सैतवाल (रा. शास्त्री नगर जामनेर) असे उपचारादरम्यान मरण पावलेल्या 65 वर्षाच्या वयस्कर वाचमनचे नाव आहे.

अरुण आत्माराम सैतवाल हे जामनेर येथील भंगार दुकानावर वाचमनचे काम करत होते. 11 ऑगस्टच्या भल्या पहाटे तिन वाजेच्या सुमारास ते झोपेत असतांना काही चोर त्याठिकाणी आले. आलेल्या चोरांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. मारहाणीनंतर चोर पळून गेले. जखमी झालेल्या अरुण सैतवाल यांना उपचारार्थ गोदावरी हॉस्पीटल जळगाव खुर्द येथे दाखल करण्यात आले. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी ते मयत झाले. या मृत्यूप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक मोहिते करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment