विविध आरोपाखाली डॉक्टरकडून अमळनेरला गुन्हा दाखल

जळगाव : अमळनेर येथील नर्मदा मेडीकल फाऊंडेशन संचलीत दवाखान्यातील डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतांनाच या दवाखान्यातील एका महिला डॉक्टरने जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरोड्याचा प्रयत्न या प्रमुख आरोपाखाली डॉ. कु. हर्षल देवदत्त संदानशिव यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

दवाखान्यातील रुग्ण महिलेवर मोफत उपचार करावे असे दडपण टाकत आम्ही दिलेले पैसे परत करावेत तसेच आत्ताच्या आता आम्हाला दहा हजार रुपये रोखीने द्यावे अशी मागणी सहा प्रमुख जणांसह त्यांच्यासोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर तुम्ही आम्हालाअ दहा हजार रुपये दिले नाही नाही तर आम्ही तुमच्यावर खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करु तसेच तुम्हाला जीवे ठार करु अशी धमकी डॉक्टरांना मिळाल्याचे म्हटले आहे. या मागणीला साक्षीदार डॉक्टरांनी नकार दिला असता डॉक्टरांच्या टेबलमधील ड्रॉवरमधील रक्कम जबरीने काढण्याचा प्रयत्न करत्ण्यात आला. तसेच बीपी ऑपरेटरचा लोखंडी स्टॅंड डॉक्टरांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संतापाच्या भरात लोखंडी खुर्ची उचलून पेशंटच्या टेबलच्या काचेची तोडफोड केल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here