हिरवाई अन् निळाई जगलेले…गायनातून कवी महानोरांप्रती कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन

On: August 27, 2023 8:30 AM

जळगाव दि. २६ प्रतिनिधी – स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “हिरवाई अन् निळाई जगलेले..” या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी  ७ वाजता करण्यात आलेले आहे  जळगावसह महाराष्ट्र व संपूर्ण देश हे जाणतोच की दिनांक ३ ऑगस्ट रोजी पद्मश्री ना.धों. महानोर यांना देवाज्ञा झाली. निसर्ग कवी म्हणून अवघ्या देशाचे सुपरीचित व्यक्तिमत्व म्हणजे महानोर दादा. शेती-वाडी पाणी, कविता, वही गायन आणि निसर्गात रमणारे कवी व लेखक म्हणून आपण त्यांना सर्वच  ओळखतो.

ते गीतकार असलेल्या जैत रे जैत या चित्रपटातील सुमधुर गीतांचं गारुड आजही मराठी मनावर अधिराज्य करीत आहे. अशा या रानकवींना त्यांनी रचलेल्या कविता व अजरामर गीते गाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तमाम जळगावकर रसिकांना यानिमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की निसर्गाशी एकरूप झालेल्या या महाकवींच्या हृद्य आठवणी व गाणी ऐकण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित रहावे. या कार्यक्रमात सहभागी कलावंत हे जळगावच्या सांस्कृतिक विश्वात आपले वेगळे स्थान अधोरेखित केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, व दीपक चांदोरकर हे असून सुसंवादीनी म्हणून पूर्वाश्रमीच्या जळगावच्या व सद्यस्थितीत पुणे येथे स्थायिक असलेल्या आकाशवाणीच्या निवृत्त जेष्ठ  उद्घोशिका डॉ. प्रतिमा विश्वास या करणार आहेत. तरी रसिकांनी या कृतज्ञता सोहळ्यास आपली उपस्थिती द्यावी असे नम्र आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन च्या वतीने करण्यात आलेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment