जळगाव (प्रतिनिधी) : सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या तिथीप्रमाणे ८२६ वी जयंती आज शिरसोली येथिल संत नरहरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी भारत राष्ट्रीय समिती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा कृ.उ.बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ (लकी टेलर) यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी माजी प.स.सभापती नंदलाल पाटील, सरपंच हिलाल अप्पा भिल्ल, विकासो चेअरमन ॲड.विजय बारी, ग्रा.प.सदस्य श्रावण शंकर ताडे, प्रदिप पाटील, शाम अस्वार, रामकृष्ण काटोले, मिठाराम पाटील, शालिग्राम पवार, संजू पवार, बबन धनगर,हे उपस्थित होते. दरम्यान संत नरहरी महाराज यांच्या केलेल्या कार्या संदर्भात ॲड.विजय बारी, रामकृष्ण काटोले यांनी माहिती दिली. सुत्रसंचलन भगवान सोनार यांनी केले तर आभार कैलास अहिरराव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र बाविस्कर, गजानन दुसाने, समाधान सोनार, संजय सोनवणे, अतुल भालेराव, संजय वाघ, विलास अहिरराव, मुकुंदा सोनार, दिपक अहिरराव, बंडू सोनार, प्रशात दाभाडे, पपु सोनार, निलेश नेरकर, ज्ञानेश्वर नेरकर, रमेश सोनार, अनिल सोनार, शांताराम घोडके, आत्माराम भालेराव, प्रकाश भामरे, आदी उपस्थित होते.