आजचे राशी भविष्य (26/09/2023)
मेष : नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठींबा मिळेल. खोळंबलेली कामे पूर्ण करा. मेहनतीचे चीज होईल.
वृषभ : दिवसभर कामात व्यस्त रहाल. सामंजस्याच्या बळावर हितशत्रू व विरोधकांना परास्त कराल.
मिथुन : कुणाला दुखवू नका. सध्याचा काळ शांततेत व्यतीत करा. जुन्या आठवणी मनात रुंजी घालतील.
कर्क : कुणाला नाव ठेवण्यास जागा करु नका. जनसंपर्कात अजून भर पडेल. प्रवासाचे योग संभवतात.
सिंह : विचारपुर्वक कोणताही निर्णय घ्या. एखादी गुंतवणूक करु शकता मात्र अनावश्यक खर्च टाळा.
कन्या : शेअर बाजारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. योग्य कामासाठी पैसे खर्च होतील.
तुळ : आपल्या मधुर वाणीने समोरच्या व्यक्तीला आकर्षित कराल. आहारावर योग्य ते नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : जुन्या गैरसमजुतीतून मुक्त व्हा. आशावाद ठेवून पुढे मार्गक्रमण करा. वाद टाळण्याचा प्रयत्न करा.
धनु : व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक आघाडी उत्तम असेल. विपणन क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.
मकर : आपल्यामुळे कुणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. उत्साहवर्धक व प्रगतीकारक दिवस.
कुंभ : मानसिक समतोल साधण्याचा प्रयत्न करा. संयम बाळगून वागण्याचा दिवस.
मीन : मान, सन्मान व प्रतिष्ठेत भर पडेल. मन उत्साही राहील. एखादा प्रवास घडू शकतो.