सैन्यदल प्रशिक्षणासाठी संघर्ष करिअर अकॅडमीची स्थापना

जळगाव (प्रतिनिधी) : कुठलेही ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी मेहनती बरोबर सचोटी देखील असावी लागते. त्याचबरोबर ध्येयाप्रती लक्ष्य एकाग्र करून सैन्यदल व पोलीस भरतीमध्ये निश्चित यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे संघर्ष करिअर अकॅडमीचे बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस व सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता संघर्ष अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेमधून अकॅडमीचे संचालक योगेश राठोड यांनी अकॅडमीविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातील व त्याचा उद्देश थोडक्यात स्पष्ट केला. यानंतर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच शिरसोलीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आगमन झाले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अकॅडमीला सदिच्छा देऊन तरुणांना सैन्यदल व पोलीस भरतीसाठी घडवण्याकरिता अकॅडमीने विशेष परिश्रम घ्यावे. मार्गदर्शन हवे असल्यास पोलीस दल सहकार्य करेल, अशी ग्वाही निरीक्षक हिरे यांनी दिली. तरुणांना सैन्यदल, पोलीस भरतीसह प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी पूर्ण शारीरिक व बौद्धिक ताकद लावून यश संपादन करण्यासाठी शंभर टक्के द्यावे लागतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले. तर आभार सौ.मयुरी राठोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी अर्जुन पाटील, नितीन पाटील, सौरव पाटील, विनोद मोरे, अविनाश मराठे, चंद्रकांत महाजन, हुसेन तडवी, अर्जुन महाजन,दिपक पाटील,अमोल जाधव, कीशोर आबंटकर,अजय चव्हाण,सागर पवार,राकेश गायकर, आविष्कार अदागळे,आदींनी परिश्रम घेतले. शिरसोली गावामध्ये प्रथमच आर्मी व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र निर्माण झाले आहे. जे विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण झाले आहेत, अशांना या संघर्ष अकॅडमी मध्ये प्रवेश सुरु झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here