मोटार सायकल चोरीतील फरार साथीदाराचा गोवंश चोरीतही सहभाग

जळगाव : मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार साथीदारास अटक केली असता चौकशीअंती त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा गोवंश चोरीतदेखील सहभाग उघड झाला आहे. अमजद कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनला मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात तो फरार होता. तो सुरत येथे राहण्यास निघून गेला होता. दरम्यान तो जळगाव येथे येणार असल्याची माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्याला गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.

गेल्या 29 जून 2023 रोजी खेडी येथील रहिवासी जितेंद्र चौधरी यांच्या ताब्यातील मोटार सायकल रेमंड कंपनी परिसरातून चोरी झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात यापुर्वी गोपाल भाईदास शिरसाठ (रा. पिळोदा ता. शिरपुर) यास अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यातील त्याचा साथीदार अजमद फकीरा कुरेशी (रा. तांबापुरा, जळगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर होते. तो सुरत येथे राहण्यास निघून गेल्याची माहिती पोलिस पथकाला समजली होती. दरम्यान तो जळगाव येथे येत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली.

त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींनी त्याला अटक केली. अधिक चौकशीअंती 3 सप्टेबर 2023 रोजी मास्टर कॉलनी परिसरातून त्याने तिन महिने वयाचा गो-हा चोरी केल्याचे कबुल केले. या चोरीप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गो-हा चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. न्यायमुर्ती श्रीमती सुर्वणा कुलकर्णी यांच्यान्यायालयात त्याला हजर करण्यातआले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. अटकेतील अमजद कुरेशी हा अट्टल चोरटा असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी गुरे चोरीसह मोटर सायकल चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here