आत्महत्येपासून केले महिलेस परावृत्त – एमआयडीसी पोलिसांचे फलित

जळगाव : मानसिकरित्या खचलेल्या महिलेस आत्महत्येपासून परावृत्त करत तिचा जीव वाचवण्याचे काम एमआयडीसी पोलिसांनी आज केले. मानासिक दृष्टीने कमकुवत महिला आज मेहरुण तलावात आत्महत्या करण्यास गेली होती.

स्थानिक रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार आला. या बाबतची माहिती लागलीच 112 क्रमांकावर देण्यात आली. काही वेळातच 112 क्रमांकावर तैनात कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेची समजूत घालत तिला अनमोल जीवनाचे महत्व समजावून सांगत आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यात पोलिस पथकाला यश आले.

महिलेची मानसिक अवस्था स्थिर करत तिला एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणले. महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत तिची आई आणि मावशी यांना बोलावून महिलेस त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोहेकॉ नितीन पाटील, चंद्रकांत पाटील, महिला पोलिसकर्मी सपना येरगुंटला आदींचे याकामी योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here