जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव शहर रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील इसम गणेश उर्फ नाना गंगाराम कोळी यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. गणेश उर्फ नाना गंगाराम कोळी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे सहा आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे एक असे एकुण सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 93 प्रमाणे दोन वेळा तसेच सी.आर.पी.सी. 144 (2) प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरीदेखील त्याच्या कायदा विरोधी कृतीत फरक पडला नाही.
त्याच्या गावठी हातभट्टी दारु विक्रीच्या व्यवसायामुळे जळगाव शहरातील कोळीवाडा पिंप्राळा जळगाव परिसरासह इतर परिसरातील तरुण मुले व्यसनाधिन झाली होती. मुली व महिलांच्या छेडखानीचे प्रकार देखील वाढीस लागले होते. गणेश कोळी याच्यावर कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी त्याच्याविरुद्ध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए कायद्याखाली प्रस्ताव तयार केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांच्या मदतीने तयार करण्यात आलेला प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी संमत केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील, पो.उप.नि. प्रदीप बोरुडे, पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.हे.कॉ. सुनील दामोदरे, पो.हे.कॉ. राजेश चव्हाण, पो.हे.कॉ. विजय खैरे, पो.ना. रेवानंद साळुंखे, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.ना. हेमंत कळसकर पो.कॉ. रवींद्र चौधरी, पो.कॉ. उमेश पो.कॉ. जुलालसिंग परदेशी, पो.कॉ. इरफान मलिक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.








