महिला डॉक्टरचा हात ओढून इंजेक्शन देण्यास बळजबरी

जळगाव : महिला डॉक्टरचा हात ओढून तिला टीटीचे इंजेक्शन देण्याची बळजबरी करणा-याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात एक महिला डॉक्टर दवाखाना चालवते. त्या दवाखान्यात एक इसम आपल्या जखमी हातावर इलाज करण्यासाठी आला. मला औषधी लिहून द्या असे म्हणाला. त्या रुग्ण इसमाला महिला डॉक्टरने औषधी लिहून दिल्यानंतर तो निघून गेला. मात्र पुन्हा काही वेळाने तो परत आला. मला टीटीचे इंजेक्शन द्या अशी तो महिला डॉक्टरकडे गळ घालू लागला.

माझ्याकडे टीटी चे इंजेक्शन नाही तुम्ही सरकारी दवाखान्यात जावून घ्या असे महिला डॉक्टरने त्याला सांगितले. त्यावेळी त्या इसमाने कॅबीनचा दरवाजा उघडून बाहेर कुणी नसल्याची खात्री केल्यानंतर पुन्हा इंजेक्शनसाठी बळजबरी करु लागला. महिला डॉक्टरने त्याला विरोध केला असता त्याने तिचा डावा हात पकडून जवळ ओढले. तु काय कामाची डॉक्टर आहे. तु लव्ह मॅरेज केले आहे……..  अशा स्वरुपाचे बोलणे केले. प्रसंग हाताबाहेर जात असल्याचे बघून डॉक्टरने आरडाओरड केली असता तो रुग्ण पळून गेला. या घटनेप्रकरणी संबंधिताविरुद्ध डॉक्टरने दिलेल्याफिर्यादीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पांडुरंग गोरबंजारा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here