मला हद्दपार का केले? म्हणत पोलिसाला धमकी वजा विचारणा

On: September 24, 2023 9:25 AM

जळगाव : मला हद्दपार का केले अशी फोनवर धमकी वजा विचारणा करणा-याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण रघुनाथ सपकाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगाव उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात महेश सुधळकर हे नेमणूकीस आहेत. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत ते आपल्या निवासस्थान परिसरात मोटार सायकलवर असतांना पलीकडून त्यांनामोबाईलवर कॉल आला. पलीकडून बोलणा-या भुषण रघुनाथ सपकाळे याने महेश सुधळकर यांना मला हद्दपार का केले अशी धमकी वजा विचारणा केली. याप्रकरणी महेश सुधळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विठ्ठल पाटील करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment