जळगाव : पोलिस कर्मचा-याला जातीवाचक शिवीगाळ आणि चारचौघात चापटा बुक्क्यांनी मारहाण करणा-या दोघांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल उर्फ भावेश भगवान पाटील व सागर विठ्ठल पाटील असे भडगाव येथे राहणा-या आणि गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
हे.कॉ. विजय धर्मा जाधव हे भडगाव पोलिस स्टेशनला नेमणूकीस आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शासकीय कामकाज करत असतांना विठ्ठल भगवान पाटील व सागर विठ्ठल पाटील या दोघांनी त्यांच्या अंगावर धावून जातीवाचक शिवीगाळ केली. मला तुझा पुर्ण इतिहास माहिती आहे … वगैरे बोलत चार चौघात पानउतारा करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मी तुमच्या डिपार्टमेंटच्या माझ्या मोबाईलमधे रेकॉर्डींग केल्या आहेत. तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करतो असे म्हणत दोघांनी हे.कॉ. जाधव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
सागर पाटील याने हे.कॉ. जाधव यांचा शर्ट फाडून तु भडगाव शहरात कुठेही भेटला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अशा स्वरुपाच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख करत आहेत. या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली आहे.