राज खिलनानी यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला

On: August 25, 2020 10:00 PM

पुणे : उंड्री येथील एका सोसायटीत एकाचवेळी दोन फ्लॅट फोडण्यात आले आहेत. फोडण्यात आलेले फ्लॅट सेवानिवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी तसेच नैला रिझवी यांचे आहेत.न्याती विंडसर सोसायटीचे अध्यक्ष श्याम खंते (६७) यांनी कोंढवा पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली आहे. राज खिलनानी (सेवानिवृत्त पोलीस महासंचालक) हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख होते. ते यापुर्वी जळगाव जिल्हयाचे पोलिस अधिक्षक देखील होते. ते बाहेरगावी गेले असताना २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान तिघा चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडण्याचे काम केले.

राज खिलनानी हे मार्च महिन्यात हैदराबाद येथे आपल्या कन्येकडे गेले होते. लॉकडाऊन सुरु असल्यामुळे ते तेथेच राहत होते. नैला रिझवी यांच्या फ्लॅटमध्ये महत्वाचा ऐवज नव्हता असे समजते. घरफोडीची माहिती समजताच राज खिलनानी हे आज रात्री पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या फ्लॅटमधील काय व किती एवज चोरीला गेला याचा तपशील अद्याप समजू शकला नाही. सोसायटीतील एका सीसीटीव्हीमध्ये तिघे चोरटे मध्यरात्री २ वाजता येताना व परत जाताना दिसत आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment