चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या

On: September 27, 2023 8:48 AM

जळगाव : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची तिच्या गुप्तांगात घरात वापरायची लाल मिरची पावडर टाकून हत्या केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जगन पावरा (बारेला) (रा. रोहीणी भोईटी ता. शिरपूर जिल्हा धुळे ह.मु. तळोंदा दिगर ता. चाळीसगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजेश पावरा याचा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय होता. त्या संशयातून तळोंदा दिगर शेत शिवारात त्याने अशा कृर पद्धतीने पत्नीची हत्या केली आहे. या घटने प्रकरणी रामेश्वर रुपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 261/23 भा.द.वि. 302 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment