जळगाव : जळगाव शहरातील चौघा गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) (रा. आयटीआयजवळ कुसुंबा) आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील राहुल नवल काकडे (समता नगर जळगाव), सचिन अभयसिंग चव्हाण (गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा), निलेश उर्फ गोल्या मिलींद जाधव अशी चौघा गुन्हेगारांची नावे आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने या कारवाईला पूर्णविराम मिळाला आहे.
संतोष राऊत याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला 9 गुन्हे दाखल असून दोना वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गफ्फार तडवी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. साईनाथ मुंडे, संदीप धनगर, पो.ना. इमरान सैय्यद, सुधीर सावळे, विशाल कोळी, राहुल रगडे, महिला पोलिसकर्मी हसीना तडवी आदींनी या प्रस्ताव तयार करण्याकामी सहकार्य केले. तसेच पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पोलिस नाईक किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील आदींनी त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याची पूर्तता केली.
रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल काकडे याच्याविरुद्ध एकुण तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली असून एक वेळा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे. त्याची येरवडा जिल्हा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. सचिन अभयसिंग चव्हाण याच्याविरुद्ध एकुण सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकवेळा प्रतिबंधात्मक आणि दोन वेळा अदखलपात्र गुन्ह्यांची कारवाई झाली आहे. त्याची देखील येरवडा जिल्हा पुणे येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नितेश उर्फ गोल्या मिलींद जाधव याच्या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकुण तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे. त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय सपकाळे, सुशिल चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलिस नाईक हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी, इरफान मलीक आदींनी याकामी प्रस्ताव तयार करण्याकामी सहकार्य केले. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, पो.कॉ. इश्वर पाटील आदींच्या मदतीने या कारवाईच्या यशस्वीतेकामी सहकार्य केले.