हातभट्टी, खंडणी, दरोड्यासह गुन्हेगारीचा वाळा — एमपीडीएच्या अस्त्राने बसला गुन्हेगारांना आळा

जळगाव : सण, उत्सव शांततेत पार पडण्यासह सर्वसामान्य जनतेचे दैनंदीन जीवन शांततेत जावे यासाठी जळगाव पोलिस दलाने गेल्या काही महिन्यांपासून कंबरेचा पट्टा कसला आहे. “हमे बिमारसे नही बिमारीसे लडना है” या वैद्यकीय शब्दरचनेप्रमाणे “आम्हाला गुन्हेगारांसोबत नाही तर गुन्हेगारी वृत्तीसोबत लढायचे आहे” या पोलिसी पाऊलवाटेने सध्या जळगाव पोलिस दलाची वाटचाल सुरु आहे. ज्याप्रमाणे गणपती उत्सव शांततेत पार पडले त्याचप्रमाणे आगामी सर्व सण आणि उत्सव तसेच सर्वसामान्य जनतेचे दैनंदीन जीवन शांततेत पार पडणार यासाठीच जळगाव पोलिस दलाचा हा खटाटोप सुरु असल्याचे जनतेत म्हटले जात आहे. गुन्हेगारांची कुंडली तयार करणे, त्यांचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार करणे, त्यावर कार्यवाही करणे हे जणूकाही आता जळगाव पोलिस दलाचे रुटीन काम म्हटले जात आहे. हे रुटीन काम जर रुटीन राहिले तर जळगाव शहर आणी जिल्ह्यातील जनतेसाठी निश्चितच हिताचे राहणार आहे. एमपीडीए प्रस्ताव तयार करण्यापासून ते मार्गी लागण्यापर्यंतच्या प्रवासात जे जे घटक येतात ते सर्व घटक एका समान धैय्याने चालले तर हे शक्य आहे.  

 

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली आहे. संतोष राऊत याच्याविरुद्ध एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अवैध गावठी हातभट्टी दारु विक्रीचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याचा कुसुंबा बस स्टॅन्ड परिसरात गावठी हातभट्टी विक्रीचा अड्डा होता. गावठी हातभट्टी दारुची तेथून विक्री होत असे. त्यामुळे कुसुंबा गावातील तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेले होते. पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई देखील केली होती. मात्र त्याने त्याचा अवैध दारु विक्रीचा व्यवसाय सुरुच ठेवला होता तसेच. त्याची कुटुंबासह गाव परिसरात दहशत होती. तो “हातभट्टीवाला” व धोकेदायक या संज्ञेत असल्यामुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

फक्त गुन्हेगारांसह गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात तडका स्वभाव म्हणून ख्याती मिळवलेले पोलिस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे यांनी शिघ्र गतीने या गुन्हेगाराची कुंडली संकलीत करुन प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव व्हाया एलसीबी, पोलिस अधिक्षक, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय फिरुन औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात जावून थांबला. या प्रवासात आणि प्रस्तावात एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पो.उ.नि. दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, पोकॉ. साईनाथ मुंडे, संदिप धनगर आदींनी गुन्हेगार संतोष राऊत यास कुसुंबा येथून  ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याची मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद येथे रवानगी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. सुनिल दामोदरे यांची याकामी महत्वाची भुमिका होती. आझाद कंजर याच्याविरुद्ध देखील अशाच स्वरुपाची कारवाई झालेली आहे.

रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील सचिन अभयसिंग चव्हाण याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली. त्याच्याविरुद्ध एकुण सात गुन्हे दाखल आहेत. दरोडा,  टाकणे, मारामारी, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन मारहाण करुन खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे तसेच हिंदु मुस्लीम यासारखे अदखलपात्र स्वरुपाची पनाका याशिवाय सीआरपीसी 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झाला नाही. तो नेहमी पिंप्राळा परीसरातील बुधवारच्या बाजारात सामान्य लोकांना मी या एरीयाचा दादा आहे असे धमकावून हप्त्याची मागणी करत असे. बुधवारच्या बाजारात दुकान लावणा-या दुकानदारांकडून तो प्रत्येकी विस रुपयांची मागणी आणि वसुली करत होता. नकार देणा-या दुकानदारांना मारहाण करुन त्यांच्या सामानाचे आणी मालाचे तो नुकसान करत होता. “दिवार” चित्रपटातील हिरोप्रमाणे त्याला कुणी विरोध केला नाही मात्र पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली.

रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार “धोकादायक इसम” नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव याच्याविरुद्ध तेरा गुन्हे दाखल आहेत. त्यात खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जबरी चोरी, घातक हत्यारानिशी दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव आणि हत्यारासह दंगा करुन गृह अतिक्रमण करणे, मारहाण करणे, अश्लिल शिवीगाळ करणे असे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो पिंप्राळा परीसरातील दुकानदार, पानटपरी चालक यांना मारुन टाकण्याची धमकी देवून त्यांच्यावर दहशत निर्माण करत होता. 

रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार “धोकादायक इसम” राहुल नवल काकडे याच्याविरुद्ध तेरा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारानिशी गंभीर दुखापत करणे, दिवसा व रात्रीची घरफोडी करणे, चोरी करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे याशिवाय हिंदु मुस्लीम सारखे अदखलपात्र पनाका त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे. मात्र त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. कब्जात तलवार, चाकू, कोयता असे हत्यार बाळगुन तो समता नगर परिसरातील नागरीकांवा दहशत निर्माण करत होता. मी या गल्लीचा दादा आहे, माझ्या नादी लागाल तर तुम्हाला जिवे ठार मारेन  अशा धमक्या तो देत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here