जळगाव : जळगाव जिल्ह्यात खूनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत भुसावळ शहरात खडका रोड परिसरातील महादेव मंदीरानजीक एका तरुणाचा खून झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती परिसरात वा-यासारखी परसरल्याने खळबळ माजली आहे. नाजीर शेख नशीर असे मयत तरुणाचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. पुर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे म्हटले जात आहे. मयत तरुण नाजीर याच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकल्याच्या जखमा नागरिकांना दिसून आल्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत शोक व्यक्त केला. त्याला तातडीने जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले. अधिकचा तपास सुरु आहे.
दुस-या घटनेत न्यायालयाच्या आदेशाने 22 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण पांडुरंग पाटील रा. दहिवद पोस्ट टाकारखेडा ता. अमळनेर असे मयत तरुणाचे नाव आहे. लोणे भोणे फाट्याजवळ 22 एप्रिल रोजी हा नाल्याच्या काठी प्रवीण पाटील हा तरुण मयत अवस्थेत आढळून आला होता. अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील या संशयित इसमाविरुद्ध हा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन आदेशाने दाखल खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.