नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी अमी मोदी विरुद्ध इंटरपोलद्वारा जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. केले आहे. ईडीच्या विनंतीनुसार इंटरपोलने हे अटक वॉरंट जारी केले आहे.फरार आरोपीविरुद्ध अशी नोटीस जारी केल्यानंतर इंटरपोल १९२ सदस्य देशांना ही व्यक्ती त्यांच्या देशात आढळल्यास त्या व्यक्तीला अटक करण्यास सांगते. त्यानंतर प्रत्यार्पण अथवा हद्दपारीची प्रक्रिया सुरु केली जावू शकते.

सन २०१८ मध्ये दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेचा पीएनबी घोटाळा प्रकाशझोतात आला. त्यानंतर अमी मोदी यांनी देश सोडला असल्याचे सांगण्यात येते. ईडीने नीरव मोदी, मेहूल चोकसी तसेच इतरांशी कट करण्यासह मनी लाँड्रिंगचा आरोप अमी मोदीवर करण्यात आला आहे. मार्च २०१९ मध्ये अटक केल्यापासून नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रीया सुरु आहे. मुंबईतील न्यायालयाकडून नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here