मयताच्या वारसाचा शोध होण्याकामी आवाहन

On: October 1, 2023 6:15 PM

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान मयत इसमाच्या वारसांचा शोध होण्याकामी एमआयडीसी पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे. राजु रामकृष्ण काळे (रा. परधाडे ता. पाचोरा जि. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीयअधिकारी डॉ. सातपुते यांनी दिलेल्याखबरीनुसार मयत राजु काळे या इसमास डायल 108 क्रमांकाच्या वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान 30 सप्टेबर रोजी राजु काळे याचे निधन झाले आहे. त्याच्या मृत्युप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. त्याच्या वारसांचा शोध लागणे आवश्यक असल्याने एमआयडीसी पोलिस स्टेशनला 0257-2210500 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment