डेप्युटी आरटीओ शाम लोही यांच्याकडून खंडणी स्विकारणा-याविरुद्ध गुन्हा

On: October 4, 2023 11:47 AM

जळगाव : बदनामीकारक वक्तव्य, प्रतिमा मलीन करणा-या बातम्या न छापण्याच्या मोबदल्यात दरमहा पाच हजार रुपये खंडणी स्विकारणा-या दैनिकाच्या संपादकाविरुद्ध जळगावचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम शिवाजीराव लोही यांनी गुन्हा दाखल केला आहे. दैनिक धुळे मैदान या दैनिकाचे संपादक नथ्थुभाऊ गुजर यांच्याविरुद्ध हा गुन्हा रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

आरटीओ ऑफीस जळगाव येथे हा प्रकार 3 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. या घटनेप्रकरणी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी भाग 5 गु.र.न. 322/23 भा.द.वि. 384, 506 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment