जळगाव : जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करणा-या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. ललित उमाकांत दिक्षीत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ललित दिक्षीत व त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून शुभम भगवान माळी या सम्राट कॉलनीत राहणा-या तरुणावर 28 जुलै रोजी प्राणघातक हल्ला केला होता.
दिक्षीत वाडी येथे राहणारा गुन्हेगार ललित दिक्षीत हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्याला पोलिस पथकाने पाळधी येथील हॉटेल मातोश्री येथून शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील ललित याच्याविरुद्ध यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुन्हा केल्यानंतर तीन महिन्यापासून तो फरार होता.