जळगाव : जळगाव जिल्ह्यातून दोघा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (रा. एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी जळगाव आणि दिक्षांत उर्फ दादु देवीदास सपकाळे (रा. यादव देवचंद हायस्कुल जवळ मेहरुण जळगांव) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघा गुन्हेगारांची नावे आहेत.
या दोघांविरुद्ध एमआयडीसी आणि शनिपेठ पोलीस स्टेशनला दरोड्याचा आणि खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे या सदराखाली एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे या दोघांनी टोळीने केले आहेत. या दोघांच्या हद्दपारीच्या प्रस्तावाची चौकशी उप विभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी केली.
जळगाव जिल्हयातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याकामी या दोघांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. एमआयडीसी पो.स्टे.चे पो. निरी. जयपाल हिरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, पोना इम्तियाज खान आदींनी हा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधिक्षकांकडे सादर केला होता. चौकशीअंती दोघांविरुद्ध हद्दपारीचा आदेश पारित करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरी. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी कामकाज पाहिले.