जळगाव : जुने विज मिटर नादुरुस्त असून नविन विज मिटर बसवावे लागेल. त्यासाठी मला पंचविस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणणा-या आणि लाचेचे पंचविस हजार रुपये स्विकारणा-या वायरमनला एसीबीच्या कारवाईचा शॉक बसला आहे. संतोष भागवत प्रजापती असे वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) चे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदाराच्या आईच्या नावे घराचे जुने विज मिटर आहे. हे विज मिटर जुने असून नवे विज मिटर बसवावे लागेल. त्यासाठी तुम्ही मला पंचविस हजार रुपये द्या असे म्हणत वायरमनने पंचासमक्ष लाचेची रक्कम स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारताच एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेत वायरमन विरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव यांच्यासह सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाई व मदत पथकात पोलिस निरीक्षक अमोल वालसाडे, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी सहभाग घेतला.