भुसावळ खून प्रकरणी तिघे ताब्यात

On: August 26, 2020 6:15 PM

जळगाव : भुसावळ शहराच्या श्रीराम नगरातील रहिवासी विलास दिनकर चौधरी या तरुणाचा मध्यरात्री काही तरुणांनी हत्या केली होती. झालेल्या गोळीबारात विलास चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला.या प्रकरणी त्याचे वडील दिनकर लक्ष्मण चौधरी यांनी संशयीत अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा,आकाश गणेश पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. या सर्व संशयितांसोबत मयत विलासचा वाद झाला होता. त्या रागातून त्यांनी विलास याच्यावर अगोदर चाकू हल्ला व नंतर फायर करण्यात आला होता. यावेळी विलासचा बचाव करण्यासाठी आलेली त्याची पत्नी देखील जखमी झाली होती.

आज दिवसभर तपासाअंती बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि.दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशनचे बाबसाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो. कॉ. विकास सातदिवे, कृष्णा देशमुख,संदीप परदेशी यांच्या पथकाने तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. अनिल मोरे करत आहेत.

हे देखील वाचा स्वस्तात सोने खरेदीचा मोह पडला महागात ! चौघांच्या हत्याकांडात पाच जण गेले तुरुंगात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment