पिंपरी : गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी डीएसके प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे. डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळावे अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. डीएसके प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते व ३२ हजार गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बीडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सदर याचिका दाखल करण्यात आली आहे.
अॅड. बीडकर यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे येथील न्यायालयात खटला तात्काळ निकाली निघावा अशी याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय बाकी आहे. आता बीडकर यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांचे १ हजार १५३ कोटी रुपये लवकरात लवकर देण्याच्या मागणीसह सदर प्रकरण निकाली काढाण्याची मागणी करण्यात आली आहे.