आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

On: October 28, 2023 6:51 PM

जळगाव : तु आमच्याकडे कामाला का येत नाही? तु आमच्याकडे कामावर आला नाही तर तुला चोरीच्या आरोपाखाली गुन्ह्यात अडकवून तुझी बदनामी करु अशा स्वरुपाच्या धमक्यांना कंटाळून एकाने आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर बाबुलाल सैतवाल या रावेर येथील कासार गल्लीतील रहिवासी  इसमाने राहत्या घरातील छतास दोरीने बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती. रत्नाबाई सैतवाल यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण महेश गणवाणी, अनुराग महेश गणवाणी आणि महेश देवणदास गणवाणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.  पोलिस उप निरीक्षक सचिन नवले पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment