जळगाव : उपोषणकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी अल्पवयीन शालेय मुला मुलींचा आमरण उपोषणकामी वापर केल्याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत भिकन पाटील, भिकन रमेश कोळी, लताबाई रमेश कोळी, वाल्मिक ठाकरे आणि ज्ञानेश्वर महाजन अशी गुन्हा करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एरंडोल तालुक्यातील निलॉन्स कंपनी समोर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले उपोषणार्थी बसले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांची संख्या वाढावी या उद्देशाने संगनमताने शालेय मुला मुलींचा वापर केला. बालहक्क व संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. पो.कॉ. स्वप्नील परदेशी यांनी याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. सहायक फौजदर रविंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.