चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

On: November 2, 2023 8:54 AM

जळगाव : चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला पतीविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील इसमाविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेतील जखमी महिला तिच्या मुलीसोबत मोबाईलवर बोलत होती. आपली पत्नी पर पुरुषासोबत बोलत असल्याचा संशय तिच्या पतीला आला. तु कुणाशी मोबाईलवर बोलत आहे असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. आज मी तुला मारुनच टाकतो असे म्हणत तिला जमीनीवर पाडून चाकूसारख्या धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर त्याने वार कील. त्यात महिलेच्या दोन्ही हातांवर गंभीर दुखापत झाली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment