प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

On: November 3, 2023 8:13 AM

जळगाव : घराशेजारी राहणा-या मुलासोबत मैत्री व त्यातून शरीर संबंध निर्माण झाल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पीटल येथे उपचार घेत असतांना पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या जवाबानुसार सुरुवातीला हा गुन्हा सिडको पोलिस स्टेशन संभाजीनगर येथे दाखल झाला. गुन्ह्याचे घटनास्थळ जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील असल्यामुळे हा गुन्हा अडावद पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

अडावद पोलिस स्टेशन हद्दीत या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलगी आणि तिचा संशयीत आरोपी मित्र शेजारी शेजारी राहतात. सुरुवातीला जवाब देतांना पिडीतेने तिच्यासोबत शरीर संबंध निर्माण करणा-या मित्राचे खोटे नाव पोलिसांना सांगितले. मात्र पुरवणी जवाबात नंतर खरे नाव कथन केले. तिचे व तिच्या मित्राचे संबंध तिच्याच घरात वेळोवेळी झाले असल्याचे नंतर पिडीतेने कथन केले आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचापुढील तपास स.पो.नि. गणेश बुवा करत आहेत. संशयीतास अटक करण्यात आली आहे.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment