दोन जोडप्यांच्या वादात महिलेचा वस्त्र फाडून विनयभंग

On: November 9, 2023 12:20 PM

जळगाव : दोन जोडप्यांच्या वादात महिलेचे वस्त्र फाडून विनयभंग झाल्याची घटना फैजपूर येथे घडली. या घटनेतील एका दाम्पत्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर येथील एकाच परिसरात चौघे जण अर्थात दोघे जोडपे राहतात. एका दाम्पत्याने दुस-या दाम्पत्याला झालेल्या वादातून शिवीगाळ केली. दरम्यान एकाने दुस-याच्या पत्नीचा पंजाबी ड्रेसचा कुर्ता छातीजवळ पकडून फाडला आणि तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी देखील केली. या घटनेत विनयभंग झालेल्या महिलेच्या कानातील दागिना गहाळ झाला. या घटने प्रकरणी दोघा पती पत्नीविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. अमजद खान अली शेरखान पठाण करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment