नवी दिल्ली : दुचाकी वाहनांवरील जीएसटीचा दर लक्झरियस गाड्यांप्रमाणेच आहे. परंतु याबाबत सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे की दुचाकी ही लक्झरियस नाही. त्यामुळे तिच्यापासून कोणतेही नुकसान नाही. त्यामुळे दुचाकीवरील जीएसटी दरात सुधारणा केली जाणार आहे.
मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या तत्सम वाहनांवर सध्या 28 टक्के जीएसटी लावण्यात येत आहे. दुचाकींवर आकारला जाणारा कर लवकरच कमी केला जाणार आहे. जीएसटी काउंसिलच्या 19 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यापुर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे भाकीत केले आहे. या बैठकीत दुचाकींवरील जीएसटी संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.