लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त – एकास अटक

On: November 12, 2023 2:52 PM

जळगाव : आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधीत गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन कब्जात बाळगणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यास अपायकारक व घातक प्रतिबंधीत अन्न पदार्थ असलेला रजनीगंधा पान मसाला, आरएमडी पान मसाला, राजनिवास पान मसाला, विमल पान मसाला, व्हिवन तंबाखू, जाफरानी जर्दा व एम सेंटेड तंबाखू असा 9 लाख रुपये किमतीचा गोडावून मधील साठा आणि दोन वाहने असा एकुण 19 लाख 14 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील गोडाऊन मधून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment