जळगाव : चॉपरने जखमी करुन शिवीगाळ तसेच धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन पवार (रा. शनीपेठ जळगाव) आणि नामीर खान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
रात्री अपरात्री कॉलनीत विनाकारण का फिरतात असे सुमीत वसंतलाल वलबानी या दुकानदाराने दोघांना विचारले असता त्यांना राग आला. आपल्याला जाब विचारल्याचा राग आल्याने आर्यन पवार याने सुमीत वलबानी यांना चॉपरने उजव्या हाताच्या मनगटावर मारुन जखमी केले. याशिवाय शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच नामीर खाने याने देखील सुमित वलबानी यांनाअ शिवीगाळ करुन चॉपर काढून धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश देशमुख करत आहेत.