जळगाव : तिघांना हाताशी धरुन चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वकीलासह त्यांचा पुत्र आणि इतर तिघे अशा एकुण पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. प्रविण पंडीत चव्हाण आणि त्यांचा मुलगा चिन्मय प्रविण चव्हाण यांच्यासह विलास शांताराम आळंदे, निखिल विलास आळंदे, आणि स्वप्निल विलास आळंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
अॅड. प्रविण पंडीत चव्हाण हे पुणे येथे राहतात. त्यांच्याविरुद्ध दाखल एका गुन्ह्यात तेजस रविंद्र मोरे (रा. जिल्हा परिषद कॉलनी जळगाव) यांनी जवाब दिला आहे. त्याचा राग मनात धरुन अॅड. प्रविण चव्हाण आणी त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण यांनी तिघांना हाताशी धरुन आपल्याला चार कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप तेजस मोरे यांनी केला आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख करत आहेत.