अल्पवयीन मुलगी गर्भवती – पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

On: November 21, 2023 10:34 AM

जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिच्यासोबत मुलाचे लग्न लावून दिल्याने तसेच ती अल्पवयात गर्भवती झाल्याने तिच्या पतीसह सासु, सासरे व इतर अशा एकुण सहा जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन गर्भवती मुलीने या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील गर्भवती अल्पवयीन मुलीचे खामगाव ता. दौंड जिहा पुणे येथील तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले होते. याप्रकरणी मुलीचा पती, सासरा, दिर, वडील, आई अशा सर्वांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment