विवाहितेचा विनयभंग – पाच जणांविरुद्ध गुन्हा

On: November 26, 2023 11:32 AM

जळगाव : विवाहीतेचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणी पाच जणांविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग झालेल्या महिलेच्या मुलाने आपल्या भावाला मुंबई येथे नोकरीवरुन कमी केले या संशयातून सर्व जण महिलेच्या घरी आले. त्यांनी महिलेच्या मुलाला घराबाहेर काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

आपल्या मुलाला होत असलेली मारहाण बघून महिला त्याचा बचाव करण्यासाठी धावत आली. तुम्ही माझ्या मुलाला का मारहाण करत आहात असा तिने सर्वांना प्रश्न विचारला. त्यावर आलेल्या पाचही जणांनी काहीही उत्तर न देता त्याला मारहाण सुरु ठेवली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी महिला मधे पडली असता एकाने तिचे केस पकडून तिला वर उचलले व तिच्या तोंडावर चापटांनी मारहाणीसह तिच्या अवयवास स्पर्श केला. या ओढाताणीत महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटून पडले.

दरम्यानच्या कालावधीत एका जणाने महिलेच्या अंगाला स्पर्श करत तिचे वस्त्र फाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिला बेदम मारहाण सुरुच ठेवली. इतर चौघांनी तिच्यासह तिच्या मुलाला शिवीगाळ केली. या घटने प्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अमोल गुंजाळ करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment