जळगाव : एमपीडीए कायद्याखाली एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील नाना उर्फ बुधा उत्तम कोळी या गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. नाना कोळी याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला एकुण दहा गुन्हे दाखल आहेत.
नाना कोळी याच्याविरुद्ध सर्वाधिक गुन्हे एरंडोल पोलिस स्टेशनला सात, धरणगाव पोलिस स्टेशनला दोन आणि जळगाव तालुका पोलिस स्टेशनला एक असे एकुण दहा गुन्हे दाखल आहेत. त्यात शस्त्र अधिनियम कायद्याखाली गुन्हे आहेत. नाना कोळी याच्याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील झाल्या आहेत. एरंडोल पोलिस स्टेशनचे पो.नि. सतिष गोराडे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेमार्फत पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे सादर केला होता.
या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, पो.कॉ. इश्वर पाटील आदींनी तसेच एरंडोल पोलिस स्टेशनचे पो.नि. सतिष गोराडे यांच्यासह स.पो.नि. गणेश अहिरे, पोलिस उप निरीक्षक शरद बागुल, विकास देशमुख, हे.कॉ. राजेश पाटील, अनिलपाटील, पो.ना. अकिल मुजावर, मिलींद कुमावत, पो.कॉ. प्रशांत पाटील, पंकज पाटील आदींनी सहभाग घेतला. गुन्हेगार नाना कोळी याची पुणे येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.