सुशांतसिंह राजपुत याची आत्महत्या

On: June 14, 2020 9:45 AM

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने मुंबई येथे आपल्या राहत्या घरी छ्ताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहीती स्थानिक पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही दिवसांपुर्वी सुशांतच्या व्यवस्थापकाने देखील आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सुशांतसिंह याने केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अवघा 34 वर्षाचा सुशांतने विविध मालीकांमधून काम केले आहे. याशिवाय सुशांतने काही हिंदी चित्रपटातून देखील भुमिका केल्या आहेत. एम.एस.धोनी : अन टोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने महेंद्रसिंग धोनीची भुमिका निभावली  होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment