दारुच्या नशेत ठेवले दारुच्या रिकाम्या बाटल्यांचे पोते

On: November 29, 2023 10:53 AM

जळगाव : दारुच्या नशेत दारुच्या रिकाम्या बाटल्यांचे चार पोते कंपाऊंड मध्ये ठेवून कारचे नुकसान नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश राजु वानखेडे या कानळदा ता. जळगाव येथील तरुणाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र रामेश्वर पांडे हे कानळदा रोड परिसरात राहतात. त्यांच्या घराच्या गच्चीवर आणि कंपाऊंड मधे राकेश वानखेडे याने दारुच्या नशेत फिरुन देशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांच्या चार गोण्या त्यांच्या घराच्या कंपाऊंड मध्ये ठेवल्या. त्यानंतर पांडे यांच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या कारच्या दरवाज्याचे हॅंडल तोडून नुकसान  देखील केले. या घटनेचा पुढील तपास हे.कॉ. भास्कर ठाकरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment