जळगावला वेश्या व्यवसायासाठी लॉजचा वापर – दोघांविरुद्ध गुन्हा

On: December 4, 2023 8:33 AM

जळगाव : वेश्या व्यवसायासाठी लॉज आणि हॉटेलचा वापर करणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉज मालक सागर नारायण सोनवणे व शाम विश्वास बोरसे असे विनापरवाना लॉज व हॉटेल चालवणा-या दोघांची नावे आहेत.

पश्चिम बंगाल येथील विशीच्या वयोगटातील पाच तरुणी या हॉटेल वजा लॉजमधे आढळून आल्या. 3 डिसेंबरच्या सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ माजली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment